सलग नवव्या वर्षी मोदींच्या फेट्याची शान कायम

रफिक पठाण

सलग नऊ वर्ष स्वातंत्र्यदिना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं.

Modi 1

२०१४ साली भारत देशाच्या पंतप्रधानपदी पहिल्यांदाच विराजमान झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी लाल रंगाचा फेटा बांधून देशातील नागरिकांना संबोधित केले होते

2014

२०१५ मध्ये भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या रंगाचा फेटा बांधला होता.

2015

२०१६ मध्ये त्यांनी गुलाबी रंगाचा राजस्थानी फेटा परिधान केला होता.

2016

प्रत्येक वर्षी फेट्याची शान कायम राखणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१७ मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल आणि पिवळ्या रंगाचा चौकटींची डिझाईन असणारा फेटा बांधला होता.

2017

२०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशरी रंगाचा फेटा बांधला होता. तेव्हा देखील त्यांच्या फेट्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगल्या होत्या.

2018

२०१९ वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी बहुरंगी फेट्याला पसंती दिली होती.

2019

२०२० वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशरी आणि क्रिम रंगाचा फेटा बांधला होता

2020

गेल्यावर्षी म्हणजे २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. त्यांच्या फेट्यावर लाल रंगाच्या छटा होत्या.

2021

स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढऱ्या रंगाचा फेटा घातला होता. मोदी यांच्या पांढऱ्या रंगाच्या फेट्यावर केशरी आणि हिरव्या रंगाच्या छटा प्रचंड आकर्षक दिसत होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

2022