Sandip Kapde
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यामुळे सध्या तेथे राहणाऱ्या भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ग्रॅमी पुरस्कार विजेती भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाहनेही पंतप्रधान मोदींच्या या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला आहे, तिला मोदी देखील भेटणार आहेत.
आनंद व्यक्त करताना फाल्गुनीने सांगितले की, 'मिलेट्स' या गाण्यासाठी तिला पंतप्रधान मोदींकडून खूप प्रशंसा मिळाली आहे.
पंतप्रधानांच्या अमेरिकेत आगमनामुळे येथील भारतीय खूप आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले.
'अबंडन्स इन मिलेटन्सी' हे गाणे नरेंद्र मोदी यांनी तयार केल्याचे बोलले जात आहे.
जगातीक भूक बळी कमी करण्याच्या क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी खास बनवलेले हे गाणे फाल्गुनी आणि तिचा पती गौरव शाह यांनी संगीतबद्ध केले आहे.
हे खास गाणे १६ जून रोजी रिलीज झाले आहे. फाल्गुनीने सांगितले की, हे गाणे पंतप्रधानांनी मी आणि माझ्या पतीसोबत बसून लिहिले आहे.
एएनआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये फाल्गुनी तिच्या पतीसोबत 'अबंडन्स इन मिलेटन्सी' हे गाणे गाताना दिसत आहे.
मिलेटच्या फायद्यांवर गाणे बनवण्यामागची कल्पना आणि या गाण्यावर पंतप्रधान मोदींना मिळालेल्या स्तुतीबद्दल बोलताना फाल्गुनी शाह म्हणाली, 'मी ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांनी (नरेंद्र मोदी) ट्विट केले होते.
मला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटण्याचे निमंत्रण मिळाले आहे. संगीताविषयी आमच्यात खूप छान आणि अर्थपूर्ण संवाद झाला. या गाण्याला मिळालेला प्रतिसाद अप्रतिम आहे कारण गाण्याचे कारण म्हणजे भूक संपवणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाल्गुनी 'अबंडन्स इन मिलेटन्सी' हे गाणे तयार केले आहे.
हे गाणे खरेतर मिलेटच्या फायद्यांचे वर्णन करणारे गाणे आहे, ज्याचे वर्णन जगातील भूक कमी करण्यासाठी सर्वोत्तम साधन म्हणून केले गेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.