रामराजेंपासून उदयनराजेंपर्यंत.. सातारा-माढा मतदारसंघात राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळ डिजिटल टीम

माढा लोकसभा मतदारसंघ : बोडके (ता. माण) गावात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते शेखर गोरे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Satara-Madha Lok Sabha constituency

फलटण येथील मुधोजी क्लब या मतदान केंद्रावर आज सकाळी पावने दहाच्या सुमारास विधान परिषद माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Satara-Madha Lok Sabha constituency

निंभोरे (ता. फलटण) येथे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. जिजामाला नाईक-निंबाळजार यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

Satara-Madha Lok Sabha constituency

माढा लोकसभा अंतर्गत माजी विभागीय आयुक्त, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी पत्नी अनुराधा देशमुख व कन्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यासह माण तालुक्यातील लोधवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला.

Satara-Madha Lok Sabha constituency

मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभेच्या निमित्ताने कुटुंबीयांसमवेत ल्हासुर्णे (ता. कोरेगांव) गावात मतदानाचा हक्क बजावला.

Satara-Madha Lok Sabha constituency

महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी माता तुळजाभवानी व छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे शुभाशिर्वाद घेऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

Satara-Madha Lok Sabha constituency

भुईंज येथील मतदान केंद्रावर जाऊन माजी आमदार मदनदादा भोसले, भाजपच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरभीताई भोसले यांनी मतदान केले.

Satara-Madha Lok Sabha constituency

माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील नगरपालिका शाळेत आज कुटुंबीयांसमवेत मतदान केले.

Satara-Madha Lok Sabha constituency

खासदार श्रीनिवास पाटील यांनी कराड शहरातील पालिका शाळा नंबर तीनमध्ये आज सहकुटुंब मतदान केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara-Madha Lok Sabha constituency