Shivraj Patil Chakurkar: शिवराज पाटलांचं वादांशी नातं खूप जुनं आहे...

संतोष कानडे

शिवराज पाटील चाकूरकर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते देशाचे माजी गृहमंत्री आहेत. मात्र कालच्या त्यांच्या जिहादबद्दलच्या विधानानंतर देशभरात त्यांच्याबद्दल चर्चा सुरु झालीय.

१९७३ साली शिवराज पाटील हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक मंत्रिपदं भूषवली.

१९८०साली ते पहिल्यांदा लोकसभेत गेले. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. त्यापुढील सहा निवडणुकांमध्ये ते निवडून येत होते.

चाकूरकर यांना 2004 च्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या उमेदवार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी त्यांचा पराभव केला.

पराभवानंतरदेखील काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर संधी दिली. २००४ ते २००८ मध्ये शिवराज पाटील चाकूरकर हे मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री होते.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्यावर मोठं टीकास्र झालं. देशातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवण्यात आला.

या बॉम्बस्फोटानंतर एकाच दिवशी तीन वेगवेगळे सफारी सूट परिधान केल्याने माध्यमांनी त्यांच्यावर आसूड ओढला. या सगळ्या गदारोळात त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

दरम्यानच्या काळात सत्य साईबाबांच्या चरणी लीन झाल्याने शिवराज पाटील भलतेच चर्चेत आले होते. २०१० ते २०१५ या काळात ते पंजाब राज्याचे राज्यपाल होते.

''जिहाद केवळ कुराणमध्ये नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जूनाला जिहादच शिकवला'' असं विधान त्यांनी काल एका कार्यक्रमात केलं. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर जोरदार टीकास्र सुरु केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

politics