Poonam Pandey : गुगलनं देखील केलं होतं बॅन!

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी पुनम पांडे ही नेहमीच तिच्या तऱ्हेवाईक फॅशनसाठी ओळखली जाते.

गेल्या काही दिवसांपासून पुनम ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

वेगवेगळ्या टीव्ही शोमध्ये आलेल्या पुनमवर एकेकाळी गुगलनं देखील बंदी घातली होती. तिचे कोणतेही फोटो प्रसिद्ध होणार नाही याची काळजी घेतली होती.

सोशल मीडियावर पुनम तिच्या बोल्डनेससाठी ओळखली गेली आहे. त्यावरुन ती अनेकदा ट्रोल देखील झाली आहे.

पुनमनं आता इंस्टावर जे फोटो शेयर केले आहे त्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

आताही पुनमच्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट असल्याचे दिसून आले आहे.

पुनम ही कंगना रनौतच्या लॉक अपमध्ये देखील दिसली होती. त्या शोमधून तिनं अमाप लोकप्रियता मिळवली होती.

त्या शो मध्ये पुनमनं आपल्याला देखील किती संकटांचा सामना करावा लागला हे तिनं सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonam Pandey