Popeye Birthday : चिमुकल्यांचा लाडका पॉपॉय झाला ९४ वर्षांचा

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला Popeye आठवतोय का? तोच Popeye जो कोणतंही संकट आलं की, पटकन पालक खायचा आणि शत्रूशी, संकटाशी दोन हात करायचा. 

Popeye Birthday | esakal

९० च्या दशकात कित्येक मुलांना पालेभाजी खाण्याची सवय लावणारा आपल्या सगळ्यांचा लाडका पॉपॉय ९४ वर्षांचा झाला आहे. 

Popeye Birthday | esakal

Popeye, एक काल्पनिक कार्टून पात्र होतं.

Popeye Birthday | esakal

अमेरिकन व्यंगचित्रकार Elzie Crisler Segar यांनी आपल्या कुंचल्यानं पोपायला रेखाटलं.

Popeye Birthday | esakal

काही दिवसांतच हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. हे पात्र नंतर कॉमिक बुक, टेलिव्हिजन कार्टून, व्हिडिओ गेम्समध्येसुद्धा समाविष्ट करण्यात आलं. 

Popeye Birthday | esakal

१९८० मध्ये दिग्दर्शक रॉबर्ट ऑल्टमॅन यांनी पॉपॉय या पात्रावर बेतलेला एक लाईव्ह अॅक्शन चित्रपटदेखील बनवला.

Popeye Birthday | esakal

पॉपॉय हे पहिलं असं कार्टुन कॅरेक्टर आहे, ज्याचं शिल्प साकारण्यात आलं होतं. क्रिस्टल सिटी, टेक्सासमध्ये पॉपॉय खात असलेल्या पालकाचं रंगीत मूर्ती स्थापन करण्यात आली होती. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Popeye Birthday | esakal