Puja Ritual : देवाला फुलं का वाहतात? जाणून घ्या अध्यात्मिक कारण

धनश्री भावसार-बगाडे

फुलांना विशेष महत्व

हिंदू धर्मात पूजा करताना फुलांना विशेष महत्व आहे. असं मानलं जातं की, देवाला फुले अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.

Puja Ritual | esakal

फुलांचे महत्व

असं मानलं जातं की, देवाच्या चरणी फुले वाहिल्याने पुण्यवृद्धी, पापांचा नाश होतो. उत्तम फलप्राप्ती होते.

Puja Ritual | esakal

फुलं वाहण्याची पद्धत

देवाचा श्रृंगार करताना फुलं नेहमी डोक्यावर वाहावी तर पूजा करताना नेहमी चरणांशी अर्पण करावी.

Puja Ritual | esakal

देवाला फुलं प्रिय

देवाला फुलं प्रिय असतात. तुम्ही देवाला चांदी, सोने काहीही चढवले तरी त्याने देव एवढा खूश होत नाही त्यापेक्षा फुलं अर्पण केल्याने होतात.

Puja Ritual | esakal

फुलांचा हार

फुलांपेक्षा हार घातल्याने दुप्पट फळ मिळते असं मानलं जातं. असं केल्याने दारिद्र्य दूर होतं आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते.

Puja Ritual | esakal

गणेश पूजनासाठी फुलं

गणेश पूजनासाठी तुळस सोडून कोणतीही फुलं चालतात. पण लाल रंगाची फुलं गणरायाला प्रिय असतात असं मानलं जातं.

Puja Ritual | esakal

भगवान शंकराचे प्रिय फुल

शंकराला शक्यतो पांढऱ्या रंगाची फुले वाहावीत असा संकेत आहे. याशिवाय धोत्रा, हरसिंगार, कन्हेर, कुसुम आक, सुकलेले कमल गट्टे इत्यादी फुले अर्पण करावीत.

Puja Ritual | esakal

देवीच्या पूजेसाठी फुलं

देवीच्या पूजेसाठी विशेषतः झेंडू, शेवंती, लाल रंगाची सर्व फुलं यांना विशेष महत्व असतं.

Puja Ritual | esakal

मंजिरी

तुळस, मंजिरी विष्णू देवाला विशेष प्रिय मानली जाते. मंजिरी कधीही शिळ्या होत नाही, असं मानलं जातं.

Puja Ritual | esakal

बेलाचं पान

देवाला कधीच कोणतंच फुल, पान उलट वाहत नसतात. पण फक्त बेल पत्र पिंडीवर वाहताना उलट वाहिले जाते.

Puja Ritual | esakal

आध्यात्मिक महत्व

फुलं हे समर्पणाचं प्रतिक समजलं जातं. त्यांचा जन्मच दुसऱ्यासाठी मानला जातो. असं समर्पण देवा प्रती व्हावं हे मागणं या कृतीतून केलं जातं. हारातली फुले दांडी वर तोंड खाली असे ओवून नम्रतेचा संदेश दिला जातो.

Puja Ritual | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puja Ritual | esakal