Tallest Pyramids: थक्क करणाऱ्या उंचीचे जगातील ७ सर्वात मोठे पिरॅमिड्स!

Swapnil Kakad

त्रिकोणी आकाराचे हे पिरॅमिड्स इजिप्तमधील राजांच्या (फेअरो) दफनाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहेत. पण इजिप्तच्या सीमेपासून दूर इतर देशांमध्ये ७ असे पिरॅमिड्स आहेत जे जगातील सर्वांत मोठे पिरॅमिड्स म्हणून ओळखले जातात.

egyptian pyramids

चोलूलाचा ग्रेट पिरॅमिड, मेक्सिको

सुमारे ५५ मीटर उंचीचा हा पिरॅमिड ४५० एकरवर पसरलेला आहे. ह्याच्या विशाल आकारामुळे ह्याला 'माणसाने बनवलेला डोंगर' म्हणूनही ओळखले जाते.

mexico pyramids

ट्रान्समेरिका पिरॅमिड, सॅन फ्रान्सिस्को

सॅन फ्रान्सिस्कोमधील ८५३ फूट उंच गगनचुंबी इमारत हे जगातील सर्वात उंच आधुनिक पिरॅमिड आहे. मॉँटगमरी रोडवरील हे पिरॅमिड टुरिस्ट आकर्षणांपैकी एक आहे.

son francisco pyramids

गिझाचे ग्रेट पिरॅमिड, इजिप्त

इ.स.पू २६०० मध्ये राजा खुफूने २.३ अब्ज दगडांचा वापर करून बांधलेले १३८.५ मीटर उंचीचे हे पिरॅमिड काळाच्या कसोटी पार करून आजतागायत उभे आहे. हे सध्या अस्तित्वात असलेलं पुरातन काळातील एकमेव आश्चर्य आहे.

egyptian pyramids

खाफ्रेचा पिरॅमिड, इजिप्त

राजा खाफ्रेने बांधलेले १३६ मीटर उंचीचे ह्या पिरॅमिडमध्ये व्हॅली टेम्पल आहे. ह्याकारणाने हे पिरॅमिड इतर पिरॅमिड्सपेक्षा वेगळे आहे.  

khoprichas pyramid

ला दांता, ग्वातेमाला

२३६ फूट उंचीचे हे पिरॅमिड झाडा-झुडपांनी पूर्णतः वेढलेले आहे. ह्या पिरॅमिडबद्दलच्या माहितीवरून हे पिरॅमिड बांधायला १५ दशलक्ष दिवस लागले असे कळते.

pyramid

इजिप्तचे वाकलेले पिरॅमिड

१०४ मीटर उंचीच्या ह्या पिरॅमिडच्या ह्याच्या आकारावरून हे नाव मिळाले आहे. गुळगुळीत बाजूंचे पिरॅमिड बांधण्याचा हा पहिला प्रयत्न फसल्याने ह्या पिरॅमिडला असा आकार मिळाला.

pyramid

लक्सर, लास वेगास

जगातील दुसरे मोठे पिरॅमिड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या आधुनिक पायरॅमिडची उंची १०८ मीटर असून इजिप्तमधील लक्सर शहराच्या नावावरून ह्या पिरॅमिडला हे नाव दिले गेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

pyramid