राहुल गांधींनी वापरलेल्या ऑस्ट्रियन बाईकची किंमत ऐकून थक्क व्हाल..

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बाईक राईड चर्चेत असून, राहुल गांधी स्वतः बाईकवरून लेहहून पँगोग तलावापर्यंत गेले होते.

Rahul Gandhi | Esakal

राहुल गांधी यांचा लडाख दौरा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे, तसेच त्यांनी ही सहल ज्या बाईकने केली ती देखील खूप चर्चेत आहे. चला तर मग जाणून घेऊया या बाईकमध्ये काय खास आहे.

Rahul Gandhi | Esakal

आम्ही तुम्हाला सांगतो की ही ऑस्ट्रियन बाईक उत्पादक कंपनी KTM ची प्रसिद्ध KTM 390 Adventure बाईक आहे. गांधींनी जे मॉडेल वापरलं ते २०२०मधील आहे. ही बाईक अ‍ॅडव्हेंचर टूरसाठी खूप प्रसिद्ध आहे.

Rahul Gandhi | Esakal

बाईक स्टँडर्ड आणि स्पोक व्हीलसह एकूण दोन प्रकारांमध्ये येते, ज्याची किंमत 3.39 लाख ते 3.61 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Rahul Gandhi | Esakal

या बाइकमध्ये 373 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन वापरण्यात आले आहे, जे 43.5PS पॉवर आणि 37Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे

Esakal

स्टँडर्ड व्हेरियंटला सीटची कमी उंची मिळते तर वरच्या व्हेरियंटला स्पोक्ड व्हील मिळतात, जे दोन लीन-एंगल ट्रॅक्शन कंट्रोल मोडसह येतात, ज्यामध्ये स्ट्रीट आणि ऑफरोडचा समावेश होतो.

Rahul Gandhi | Esakal

त्याच्या स्टँडर्ड व्हेरियंटला नॉन-अ‍ॅडजस्टेबल इनव्हर्टेड फोर्क सस्पेंशन मिळते, तर टॉप व्हेरियंटला प्री-लोड अ‍ॅडजस्टेबल सिस्टम मिळते. ज्यात तुम्ही तुमच्या गरजेनुसार बदल करू शकता.

Rahul Gandhi | Esakal

ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) सह येणार्‍या या बाईकच्या पुढील बाजूस 320 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 230 mm डिस्क ब्रेक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi | Esakal