Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थानात भाजपची सत्ता आल्यास 'योगी' होणार मुख्यमंत्री?

बाळकृष्ण मधाळे

बाबा बालकनाथ महंत चांदनाथ यांचे निकटवर्तीय

Rajasthan Assembly Election Results 2023 : मूळचे अलवर जिल्ह्यातील बेहरोर भागातील मोहराना गावचे रहिवासी असलेले बाबा बालकनाथ (Baba Balaknath) गेल्या पंधरा वर्षांपासून हनुमानगड जिल्ह्यातील आश्रमात राहत होते. बाबा बालकनाथ हे महंत चांदनाथ यांचे निकटवर्तीय होते. सुरुवातीच्या काळात महंत चांदनाथही या आश्रमात राहत होते.

Rajasthan Assembly Election Results 2023 Baba Balaknath

मेवातच्या अलवर भागात नाथ पंथाचा प्रभाव

महंत चांदनाथ 2004 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत अलवरमधील बेहरोरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. मेवातच्या अलवर भागात नाथ पंथाचा प्रभाव पाहून भाजपनं 2014 च्या लोकसभा निवडणुकीत चंदनाथ यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र सिंह यांचा पराभव करून चंदनाथ खासदार झाले. पुढं दीड वर्षांपूर्वी आजारपणामुळं त्यांचं निधन झालं.

Rajasthan Assembly Election Results 2023 Baba Balaknath

चांदनाथ यांचे उत्तराधिकारी बाबा बालकनाथ

महंत चांदनाथ यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या या जागेवर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपनं जसवंत सिंह यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा काँग्रेसचे उमेदवार डॉ. करण सिंह यांच्याकडून पराभव झाला होता. सिंग यांच्या पराभवामुळं ही जागा भाजपच्या हातून निसटली होती. यावेळी भाजपनं आपली गमावलेली जागा परत मिळवण्यासाठी चांदनाथ यांचे उत्तराधिकारी बाबा बालकनाथ यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती.

Rajasthan Assembly Election Results 2023 Baba Balaknath

बाबा बालकनाथ हे बाबा मस्तनाथ विद्यापीठाचे कुलपती

हरियाणातील रोहतक इथं आठव्या शतकात स्थापन झालेला आणि 150 एकर जमिनीवर पसरलेला श्री बाबा मस्तनाथ मठ आध्यात्मिक, सेवाभावी, वैद्यकीय आणि शैक्षणिक कार्यांसाठी प्रसिद्ध आहे. बाबा बालकनाथ हे बाबा मस्तनाथ विद्यापीठाचे कुलपतीही आहेत. महंत बालकनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या देशभरात दोन डझनहून अधिक शैक्षणिक संस्था, रुग्णालये, गोशाळे आणि धर्मशाळा सुरू आहेत.

Rajasthan Assembly Election Results 2023 Baba Balaknath

महंत बालकनाथ यांनी पहिल्यांदाच लढवली निवडणूक

नाथ संप्रदायाचे सर्वात मोठे मंदिर असलेल्या अस्थल बोहर मठाचे आठवे मठाधिपती म्हणून काम पाहणाऱ्या बाबांना हिंदी, संस्कृत, राजस्थानी आणि पंजाबी भाषा अवगत आहे. आपल्या गुरुजींच्या गादीवर बसलेले महंत बालकनाथ यांनी आता आपला राजकीय वारसा पुढं नेण्यासाठी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे.

Rajasthan Assembly Election Results 2023 Baba Balaknath

बालकनाथ हे भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात लोकप्रिय चेहरा

तिजारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बालकनाथ हे खासदार आहेत. अशोक गेहलोत यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बालकनाथ हा दुसरा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून समोर आले आहेत.

Rajasthan Assembly Election Results 2023 Baba Balaknath

मुख्यमंत्रिपदासाठी बालकनाथ यांना पहिली पसंती

इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये 10 टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी बालकनाथ यांना पहिली पसंती दिली होती. या एक्झिट पोलनुसार, बालकनाथ हे भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात लोकप्रिय चेहरा आहेत.

Rajasthan Assembly Election Results 2023 Baba Balaknath

बालकनाथ राजस्थानचे 'योगी'

राजस्थानमधील अलवर येथील खासदार बालकनाथ हे नाथ पंथाचे आहेत. ज्यातून यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येतात. बालकनाथ हे रोहतकच्या बाबा मस्तनाथ मठाचे महंत आहेत. नाथ संप्रदायाच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यानंतर बालकनाथ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना राजस्थानचे योगी देखील म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajasthan Assembly Election Results 2023 Baba Balaknath