रमाकांत आचरेकर! टेनिस बॉलमधील ब्रॅडमन ते दिग्गज घडवणारे प्रशिक्षक

अनिरुद्ध संकपाळ

सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या रमाकांत आचरकेरांचा आज स्मृतीदिन आहे.

मात्र सचिनचे प्रशिक्षक एवढीच रमाकांत सरांची ओळख नाही. क्रिकेटचा वारसा घरातूनच मिळालेल्या रमाकांत आचरेकर हे स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू होते.

रमांकात आचरेकरांना क्रिकेटचा हा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. त्यांच्या वडिलांसोबतच काका आणि भाऊ देखील क्रिकेटवेडेच होते.

रमाकांत आचरेकर हे विविध क्लबकडून क्रिकेट खेळत होते. त्याच दरम्यान त्यांना स्टेट बँकेत नोकरी देखील लागली.

स्टेट बँकेकडून खेळत असताना अजित वाडेकर यांचा सहवास देखील लागला. पुरंदरेंच्या पुस्तकात अजित वाडेकर यांनी आचरेकर हे टेनिस बॉल क्रिकेटमधील डॉन ब्रॅडमन होते असे उद्गार काढले होते.

स्टेट बँकेकडून खेळताना आचरेकरांनी हैदराबादविरूद्ध एकमेव प्रथम श्रेणी क्रिकेट सामना देखील खेळला आहे. ते उत्तम फलंदाज आणि यष्टीरक्षक होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.