सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुडाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

प्रणाली मोरे

रणदीह हुडा बॉलीवूडच्या फीट अभिनेत्यांपैकी एक. सावरकरांच्या जयंती निमित्तानं रणदीपनं पोस्ट शेअर केली होती. त्यांन शेअर केलेल्या पोस्टरमध्ये त्याला ओळखणं कठीण झालं होतं. या लूकमध्ये तो एकदम सावरकरांच्या व्यक्तिरेखेत फीट बसलेला दिसत होता. सिनेमाची तयारी जोरदार सुरू आहे पण अद्याप रिलीज डेटचे क्न्फर्मेशन मिळालेलं नाही.

सध्या रणदीप आपल्या आगामी सिनेमाच्या तयारी व्यस्त आहे.त्यानं आपल्या नव्या लूकसाठी भरपूर वजन कमी केल्याचं दिसत आहे.

Esakal

रणदीपने काही दिवसांपूर्वी आपल्या स्वतंत्र वीर सावरकर सिनेमाची घोषणा केली होती,जो सिनेमा वीर सावरकरांवर आधारित होता. या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. सिनेमात रणदीप हुडा स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Esakal

१ सप्टेंबरला अभिनेत्यानं इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्यआ बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच्या लूकचा मिरर सेल्फी शेअर केला आहे. फोटोमध्ये रणदीप लिफ्टमध्ये उभा असलेला दिसत आहे. त्यांन फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिलं आहे,''आपल्या सर्वांना कधी ना कधी लिफ्टची गरज असतेच''. फोटोत रणबीरनं कमी केलेलं वजन स्पष्ट दिसून येत आहे.

Esakal

एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत रणदीप आपल्या वेट लॉस जर्नीवर बोलला आहे. तो म्हणाला आहे,''मी आतापर्यंत १८ किलो वजन कमी केलं आहे. हे स्पोर्ट्समुळे शक्य झालं आहे. मी अशा पद्धतीनं लगेचच वेट लॉस आणि वेट गेन हे फक्त स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे शक्य करुन दाखवतो''.

Esakal

लूक ट्रान्सफॉर्मेशनसाठी कितीतरी कलाकार आपलं वजन कमी किंवा वाढवताना दिसतात. पण इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मेशन करणं सगळ्यांनाच शक्य नसतं. रणदीपनं याआधी त्याच्या अनेक सिनेमांसाठी वेट लॉस आणि वेट गेन केलं आहे.

Esakal

त्याने २०१६ मध्ये आलेल्या सरबजीतसाठी २८ दिवसांत १८ किलो वजन कमी केलं होतं, त्यावेळी त्याची खूप चर्चा झाली होती. सिनेमातील रणदीपच्या अभिनयासोबत त्यावेळी त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची देखील प्रशंसा करण्यात आली होती. रणदीपच्या करिअरमध्ये सरबजीत हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स मानला जातो.

Esakal

रणदीप हुडानं राजकुमार संतोषीच्या 'बॅटल ऑफ सारागढी' सिनेमातील भूमिकेसाठी देखील खूप मेहनत घेतली होती. पण हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. या सिनेमातील भूमिकेसाठी रणदीपनं केस आणि दाढी अगदी लांबलचक वाढवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal