रणदीपची होणारी बायको लिन लैशराम आहे तरी कोण?

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा त्याची गर्लफ्रेंड लिन लैशराम हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी हे कपल लग्न करणार आहे. मात्र, रणदीपच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

तर रणदीपची गर्लफ्रेंड लिन लैशराम आहे तरी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

लिन लैशराम मूळची मणिपूरची आहे.  ती एक लोकप्रिय मॉडेल, अभिनेत्री आणि बिझनेस वूमन आहे.

लिनने 'जाने जान', 'मेरी कॉम', 'रंगून' आणि 'उमरिका' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम'मध्ये ती पहिल्यांदा दिसली होती. 

लिनने मिस नॉर्थ ईस्ट सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात पहिली उपविजेती ठरली होती.

रणदीप  हुड्डा आणि लिन हे दोघ 2018 मध्ये एका स्टेडियममध्ये एकत्र दिसले होते.

लिन रणदीप  हुड्डापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.