रणवीर सिंगप्रमाणेच आमीर खानच्या जावयाचंही न्यूड फोटोशूट

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याची मुलगी इरा हिचा साखरपुडा नुकताच पार पडला.

पुणेकर असलेला नुपूर शिखरे हा आता आमीर खानचा जावई होणार आहे. ईरा आणि नुपूर अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या.

एका स्पर्धेदरम्यान अनोख्या अंदाजात नुपूरने ईराला प्रपोज केलं होतं. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत होता.

साखरपुड्याच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या नुपूरचं न्यूड फोटोशूटही आता समोर आलं आहे. फिटनेस ट्रेनर असलेल्या नुपूरने तीन वर्षांपूर्वी न्यूड फोटोशूट केलं होतं.

त्यावेळी तो इतका प्रसिद्ध नव्हता. आता ईरासोबतच्या रिलेशनशीपमुळे त्याचं जुनं फोटोशूटही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.

२०१९ मध्ये नुपूरने हे फोटोशूट केलं होतं. हे फोटो आजही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आहेत.

नुपूर आणि ईरा २०२० पासून एकमेकांना डेट करतायत. ते सतत एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यांची चांगलीच चर्चाही होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.