रशीद खान टी-20 वर्ल्ड कपमध्ये करणार अफगाणिस्तानचे नेतृत्व!

Kiran Mahanavar

अफगाणिस्तानने या वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसए येथे होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी त्यांचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

ज्यामध्ये राशिद खान संघाचे नेतृत्व करत आहे. आणि करीम जनात, मोहम्मद इशाक आणि नूर अहमद यांचा संघात समावेश केला आहे.

वर्ल्ड कप 2023 मध्ये गेल्या वर्षी अफगाणिस्तानचे नेतृत्व करणारा हशमतुल्ला शाहिदी संघाचा भाग नाही, 2022 मध्ये त्याचा शेवटचा T20 सहभाग होता.

या वर्षी मार्चमध्ये आयर्लंडविरुद्ध अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवा नांग्याल खरोतीलाही संघात स्थान मिळाले आहे.

यासोबत आणखी एक युवा अफगाण खेळाडू म्हणजे यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद इशाक, जो 2020 आणि 2022 अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाचा भाग होता.

मुजीब उर रहमान, नूर अहमद, नांगयाल खरोती आणि अनुभवी मोहम्मद नबी यांच्या पाठिंब्याने रशीद फिरकी विभागाचे नेतृत्व करेल.

अफगाणिस्तान संघ : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक

राखीव : सादिक अटल, हजरतुल्ला झाझई, सलीम साफी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.