Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवन उभारायला लागली १७ वर्ष..जाणून घ्या इतिहास

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम

राष्ट्रपतीचं निवासस्थान मानलं जाणारं राष्ट्रपती भवन हे रोमच्या क्यूरनल पॅलेसनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं स्थान आहे.

या निवासस्थानास तयार होण्यास १७ वर्षांचा कालावधी लागलाय. १९१२ मध्ये भवनाच्या बांधकामास सुरूवात झाली होती. १९२९ मध्ये बांधकाम पूर्ण झालं.

२९००० मजूरांच्या अथक प्रयत्नानंतर राष्ट्रपती भवनाची भव्य ईमारत उभी राहिली.

राष्ट्रपती भवनात एकूण ७५० कर्मचारी कार्यरत आहे. त्यापैकी १४५ राष्ट्रपती सचिलयात काम करतात.

देश स्वतंत्र होण्यापूर्वी राष्ट्रपती भवनास 'व्हाईसरॉय हाऊस' नावाने ओळखल्या जात होते.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मुगल गार्डनमध्ये होणाऱ्या एका उत्सवादरम्यान राष्ट्रपती भवन लोकांसाठी उघडे असते.

प्रत्येक शनिवारी सकाळी १० ते १०.३० वाजतापर्यंत चालणाऱ्या 'चेंज ऑफ गार्ड' या सोहळ्याचे आयोजन असते.त्यावेळी देखील राष्ट्रपती भवन जनतेसाठी उघडं असतं.

राष्ट्रपती भवनातील अशोका हॉलमध्ये मंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा पार पडतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.