90 च्या दशकात रवीनाने रिजेक्ट केले होते शाहरुख खानचे चार चित्रपट, सांगितले कारण

Anuradha Vipat

या वेब सीरिजमुळे चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्या तिच्या 'कर्मा कॉलिंग' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेली ही वेबसिरीज प्रेक्षकांना खूप आवडते.

Raveena rejected four Shah Rukh Khan films

चार चित्रपटांमध्ये काम

अलीकडेच या मालिकेच्या प्रमोशनदरम्यान रवीनाने एक मोठा खुलासा केला आहे. रवीनाने सांगितले की, ९० च्या दशकात ती शाहरुख खानच्या चार चित्रपटांमध्ये काम करणार होती, पण तिने ते रिजेक्ट केले.

Raveena rejected four Shah Rukh Khan films

ही ऑफरही तिने नाकारली

रवीनाने यावेळी सांगितले की, तिला यश चोप्राच्या 'डर' चित्रपटाची ऑफरही आली होती, ज्यामध्ये तिला शाहरुखच्या विरुद्ध जुही चावलाने साकारलेली भूमिका ऑफर केली होती. मात्र, ही ऑफरही तिने नाकारली.

Raveena rejected four Shah Rukh Khan films

यामागचे कारण

यामागचे कारण स्पष्ट करताना रवीना म्हणाली की, दिग्दर्शकाच्या मृत्यूमुळे एक चित्रपट रद्द करण्यात आला होता

Raveena rejected four Shah Rukh Khan films

पण त्यालाही उशीर झाला...

तर चित्रपटातील तिच्या वेशभूषेवर ति समाधानी नसल्यामुळे तिने दुसरा चित्रपट सोडला होता. रवीना पुढे म्हणाली, 'आम्ही 'जमाना दीवाना' केला होता, पण त्यालाही उशीर झाला. याशिवाय डर हा चित्रपट मला ऑफर झाला होता पण तो मी नकारला

Raveena rejected four Shah Rukh Khan films

यांच्याही महत्त्वाच्या भूमिका

सध्या रवीना तिच्या कर्मा कॉलिंग या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. रुची नारायण दिग्दर्शित या शोमध्ये रवीना टंडन व्यतिरिक्त वरुण सूद, नम्रता शेठ आणि विक्रमजीत विर्क यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Raveena rejected four Shah Rukh Khan films

कंगना राणौतला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा धक्का

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut