अचानक केस गळण्याची कारणे

नमिता धुरी

डोक्यावर खाज येणे व जखम होणे.

टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स वाढल्यामुळे केस आतून कमकुवत होतात.

अ जीवनसत्त्वाचे अतिप्रमाणात सेवन केल्याने केसांच्या मुळांशी असलेल्या त्वचेला सूज येते व केस गळतात.

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर काही महिन्यांनी केसगळती सुरू होते.

डोक्याच्या त्वचेला संसर्ग झाल्याने त्याच्या खपल्या निघतात व केस गळतात.

थायरॉइडमुळे केस पातळ आणि कोरडे होतात.

खूप ताण घेतल्यासही केस गळतात. अशावेळी योग, मेडिटेशन यांचा आधार घ्यावा.

केस धुताना किंवा विंचरताना केसांचा पुंजका हातात येत असेल तर हे अॅनिमियाचे लक्षण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.