Relationship Tips : 'या' पुरूषांचे Love Life टिकते दीर्घकाळ

सकाळ डिजिटल टीम

आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतिमध्ये पती-पत्नीच्या नात्याविषयी मार्गदर्शन केलं आहे. कोणत्या पुरुषांच्या प्रेम संबंधात स्त्रिया खूश राहतात याची माहिती दिली आहे.

चाणक्य नीतीनुसार जिथे विश्वास असतो तिथे कोणतेही बंधन नसते.

ज्या पुरुषांनी आपल्या लाइफ पार्टनरला स्वतःच्या इच्छेने आयुष्य जगू दिले त्या पुरुषांचे प्रेमाचे नाते दीर्घकाळ टिकते.

चांगल्या नात्याचा पाया हा आदर आणि प्रेम असतो. जे पुरुष महिलांचा आदर करतात त्यांच्याशी महिलांचे प्रेमसंबंध दीर्घकाळ टिकतात.

जे पुरुष स्त्रियांचे रक्षण करू शकत नाहीत त्यांचे प्रेमप्रकरण फार काळ टिकत नाही. जर एखाद्या पुरुषाने स्त्रीसाठी भूमिका घेतली तर त्याला ते खूप आवडते.

चाणक्य नीतीनुसार जे पुरुष अहंकारी नसतात त्यांचे जोडीदारासोबतचे प्रेमसंबंध दीर्घकाळ टिकतात.

पुरुषाला आपले नाते दीर्घकाळ टिकावे असे वाटत असेल तर त्याने अहंकारापासून दूर राहिले पाहिजे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.