तुमच्या नात्याची रेशीमगाठ सैल झालिये, या उपायांनी करा घट्ट

धनश्री भावसार-बगाडे

नात्यातला ताण

हल्ली थोड्याशा कारणानेही नात्यात ताण वाढल्याचं बघायला मिळतं. जोडप्यात दुरावा वाढू लागतो. पण काही लहान लहान प्रयत्नांनी तो दूर करणं शक्य असतं.

Relationship Tips | esakal

नात्याला प्राधान्य द्या

तुम्ही कितीही बिझी असाल तरी जोडिदारासाठी वेळ काढा. नाहीतर जोडिदार स्वतःला एकटं समजेल. हे तुमच्या नात्यासाठी योग्य नाही.

Relationship Tips | esakal

संवाद साधा

दिवसभर काम आणि रात्री जेवण करून झोपून जाणं अशी जर तुमची दिनश्चर्या असेल तर यामुळे तुमच्या नात्यावर त्याचा वाईट परिणाम पडू शकतो. त्यामुळे वेळ काढून एकमेकांशी संवाद साधा.

Relationship Tips | esakal

इच्छा समजून घ्या

एकमेकांच्या आणि एकमेकांविषयीच्या अपेक्षा समजून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी एकमेकांना वेळ द्या.

Relationship Tips | esakal

प्रामाणिक रहा

आयुष्यभराच्या सोबतीसाठी एकमेकांशी प्रामाणिक आणि पारदर्शी असणे आवश्यक आहे. गोष्टी लपवू नका, खोटं बालू नका. यामुळे नात्यात ताण निर्माण होतात.

Relationship Tips | esakal

संशय घेऊ नका

जोडिदाराविषयी मनात शंका संशय येऊ देऊ नका. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आधी एकमेकांशी बोला, गैरसमज दूर करा.

Relationship Tips | esakal

साथ द्या

चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये एकमेकांना साथ द्या. जोडिदाराचं धैर्य खचू देऊ नका. खरा जोडिदारच चांगल्या वाईट प्रसंगी सोबत करतो.

Relationship Tips | esakal

जोडिदाराचं कौतुक

जोडिदाराचं कौतुक करा. आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे नात्यात प्रेम बनून राहतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips | esakal