Sandip Kapde
जग रहस्यांनी भरलेली असून केव्हा, कुठे आणि काय सापडेल याबद्दल काहीही निश्चित नाही. नुकतेच युरोपियन देश स्पेनमधील एका गुहेत जुने सँडल सापडले होते.
संशोधकांच्या माहितीनुसार ही चप्पल (सँडल) भारतातील प्राचीन ऐतिहासिक घटना महाभारताच्या काळातील आहेत.
ही गुहा खाण कामगारांनी लुटली होती. स्पेनमधील अंडालुसिया येथील एका गुहेत वटवाघळांची वसाहत आहे. जिथे अनेक जुन्या वस्तूंचा ढीग दिसत होता.
बार्सिलोना स्वायत्त विद्यापीठ आणि स्पेनच्या अल्काला विद्यापीठाच्या संशोधकांनी या गोष्टींचे परीक्षण केले तेव्हा त्यांना एस्पार्टोपासून बनवलेल्या 22 चप्पल (सँडल) सापडल्या.
एस्पार्टो हे एक गवत आहे जे फार पूर्वी उत्तर आफ्रिका आणि इबेरियन द्वीपकल्पात हस्तकलांमध्ये वापरले जात असे. याशिवाय गवतापासूनच दोरी बनवली जायची, त्यातून चप्पल विणली जायची.
संशोधकांचा दावा आहे की ही चप्पल सुमारे 6,200 वर्षे जुनी म्हणजेच निओलिथिक कालखंडातील आहेत.
सायन्स अॅडव्हान्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात, या पुरातन वास्तूंचा शोध घेणाऱ्या एका पथकाने म्हटले आहे की, ही सँडल ग्रेनाडा शहराजवळील कुएवा डे लॉस मर्सीएलागोस येथे शिकारी दफनभूमीजवळ सापडले, ज्याला 'वटवाघळांची गुहा' म्हणूनही ओळखले जाते.
तपासाअंती ती पूर्वी सापडलेल्या वस्तूंपेक्षा खूप जुनी असल्याचे आढळून आले. रेडिओकार्बन डेटिंगद्वारे एकूण 76 वस्तूंचा अभ्यास करण्यात आला, ज्यावरून असे दिसून आले की या वस्तू हजारो वर्षांपूर्वी उत्तर आफ्रिका आणि इबेरियन द्वीपकल्पात वापरल्या जात होत्या.
इतिहासकार आणि भूवैज्ञानिकांसह विविध विषयांतील 20 तज्ज्ञांच्या पथकाने या संशोधनावर काम केले.
अभ्यासात असे म्हटले आहे की काही चप्पल वापरली असल्याचे काही चिन्हे दिसली आहे. तर काही न वापरलेल्या दिसत आहेत.
हे मृतांसाठी बनवले गेले असावे असे गृहीत धरले जाऊ शकते. एकेकाळी, या गुहेत मानवी इतिहासातील बहुसंख्य दफन केलेल्या वस्तू होत्या, त्यापैकी काही 9,500 वर्षे जुन्या होत्या. न्यूज 24ने याबाबत वृत्त दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.