अनिरुद्ध संकपाळ
भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत लवकरात लवकर फिट होऊन मैदानावर परतण्यासाठी एनसीएमध्ये घाम गाळत आहे.
ऋषभ पंत आपल्या दुखापतीवर वेगाने मात करत असून त्याची प्रगती चांगली आहे.
दरम्यान एनसीएमध्ये आपल्या इतर संघ सहकाऱ्यांसोबत फिटनेसवर काम करत असाताना त्याने सोशल मीडियावर आपली जन्म तारीख बदलल्याने तो चांगलाच चर्चेत आला.
ऋषभ पंतने सोशल मीडियावर पंतने आपली जन्मतारीख 4 ऑक्टोबर 1997 ऐवजी 1 एप्रिल 2023 अशी केली आहे.
पंतने जन्म तारीख बदलण्यामागे एक मोठं कारण आहे. 30 डिसेंबर 2022 ला पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता.
या अपघातातून पंत थोडक्यात बचावला. त्यामुळे 2023 हे वर्ष पंतसाठी पुनर्जन्मच ठरले. म्हणून पंतनेही सोशल प्लॅटफॉर्मवर आपली जन्मतारीख 1 एप्रिल 2023 अशी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.