Rishabh Pant : पंतने चार महिन्याचा सहारा दिला फेकून!

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय क्रिकेट चाहत्यांना 7 जूनपासून सुरू होणाऱ्या WTC Final चे वेध लागले आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे.

टीम इंडिया यावेळी त्याचा हुकमी एक्का ऋषभ पंतविनाच ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे.

सर्वांनाच ऋषभ पंत दुखापतीतून सावरून कधी एकदा क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परततो याचे वेध लागले आहेत.

दरम्यान, ऋषभ पंतने आज आपल्या सर्व चाहत्यांना एक सुखद धक्का दिला.

त्याने सहाय्यासाठी वापरत असलेली काठी फेकून दिली आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.