हिवाळ्यात जास्त अंडी खाणं आरोग्यासाठी घातक?

Aishwarya Musale

अंडी 

आपल्यापैकी अनेकांच्या घरात अंडी खाल्ली जातात. अंड्यांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, कोलीन, लोह आणि फोलेट यांसारखे अनेक पोषक घटक असतात.

दररोज अंडी खाल्ल्याने शरीराला विविध फायदे मिळतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) नुसार अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल असते असं सांगण्यात आलं आहे.

कोलेस्ट्रॉलचे दोन मुख्य प्रकार म्हणजे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) कोलेस्ट्रॉल आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (एचडीएल).

एलडीएल कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीमुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो, एचडीएल कोलेस्ट्रॉल किंवा 'चांगले' कोलेस्ट्रॉल कमी धोकादायक आहे.

संशोधनात असेही आढळून आले आहे की, अंडी खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत नाही किंवा हृदयविकाराचा धोका वाढत नाही.

न्यूट्रिएंट्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 2018 च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, अंड्यांचा एचडीएल फंक्शन आणि लिपोप्रोटीन कण प्रोफाईलवर सकारात्मक प्रभाव पडतो. 

कोरियन जर्नल ऑफ फूड सायन्स अँड अ‍ॅनिमल रिसोर्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की,

दर आठवड्याला 2-7 अंडी खाल्ल्याने एचडीएल कोलेस्ट्रॉल उच्च पातळी राखण्यात मदत होते आणि चयापचय सिंड्रोमचा धोका कमी होतो. 

रात्रीचे जेवण टाळत आहात? तर आधी हे वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.