ये आज कल के बच्चे... रोहितचा इन्स्टा स्टोरी तुफान व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 434 धावांनी पराभव करत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली आहे.

भारताचा हा कसोटी क्रिकेटमधील धावांच्या अनुशंगाने आतापर्यंत सर्वात मोठा विजय आहे.

या सामन्यात भारताचे अनेक वरिष्ठ खेळाडू अनुपस्थित होते. मात्र भारताच्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत बलाढ्य इंग्लंडच्या नाकात दम केला.

यशस्वी जैस्वालने 214 धावांची धडाकेबाज द्विशतकी खेळी केली. तर पदार्पण करणाऱ्या सर्फराजने दोन्ही डावात अर्धशतके ठोकली.

सर्फराजसोबतच पदार्पण करणाऱ्या ध्रुव जुरेलने देखील सामन्याच्या पहिल्या डावात 46 धावांची खेळी करत चांगले योगदान दिले. तर सामन्यात भन्नाट विकेटकिपिंग करत सर्वांना प्रभावित केलं.

युवा खेळाडूंच्या या भन्नाट कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माने या सर्व खेळाडूंचा फोटो शेअर करत त्याला ये आज कल के बच्चे असे कॅप्शन दिलं.

एकाच कसोटीत शतक अन् 5 विकेट्स! जडेजा शेर तर अश्विन सव्वाशेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.