WWE : महिला कुस्तीपटूची श्रीमंती, पैशाची अन्...

अनिरुद्ध संकपाळ

WWE मध्ये एका महिला कुस्तीपटूने वर्षानुवर्षे आपला दबदबा निर्माण करून ठेवणे कठीण असते. मात्र रोंडा राऊजी ही अशी कुस्तीपटू आहे जिने फक्त आपला दबदबा निर्माण केला नाही तर कमाईतही आपला दबदबा निर्माण केला आहे.

कोण आहे रोंडा?

1987 साली जन्मलेली रोंडा ही व्यावसायिक कुस्तीपटू, अभिनेत्री माजी ज्युडोका आणि मिश्र मार्शल आर्ट्स आर्टिस्ट देखील राहिली आहे.

ऑलिम्पिक पदक विजेती

रोंडा ही ज्युडोमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली अमेरिकन महिला आहे. तिने 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये मध्ये रौप्य पदक पटकावले होते.

UFC हॉल ऑफ फेममध्ये स्थान

रोंडा ही UFC हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी पहिली महिला आहे.

WWE ची तीन विजेतेपदं

या महिला कुस्तीपटूने तीनवेळा WWE चे जागतिक अजिंक्यपद पटकावले आहे.

रेकॉर्ड

रोंडा ही फक्त WWE चॅम्पियन नाही. तर WWE आणि UFC जिंकणारी पहिली आणि एकमेव महिला खेळाडू आहे.

बेस्ट अॅथलिट

रोंडाला 2015 मध्ये झालेल्या एका पोलमध्ये लोकांनी बेस्ट फिमेल अॅथलिट ऑफ ऑल टाईम म्हणून निवड केली होती.

चित्रपटातही भुमिका

रोंडाने फास्ट आणि फ्युरिस 7, एक्पेंडेबल 3, माईल 22 यासारख्या मेगा हॉलीवूड चित्रपटात भुमिका निभावली आहे.

संपत्ती किती?

उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रोंडाची संपत्ती ही 14 मिलियन डॉलर इतकी आहे. भारतीय रूपयात याची किंमत जवळपास 114 कोटी रूपये इतकी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.