आरारारा खतरनाक... भुताची आई 'तडकडताई'... काय आहे परंपरा?

Sandip Kapde

तडकडताई

तोंडावर भुताचा मुखवटा, अंगावर काळी साडी, हातात सूप अन् लहान मुलांच्या डोक्यावर फटके... सांगलीतील तडकडताई नावाची ही परंपरा.

Sangli Tadkadtai Tradition

भुताची आई

भुताची आई, तडकडताई असं म्हणत सांगलीतील लोकं या खेळाला सुरूवात करतात.

Sangli Tadkadtai Tradition

जेष्ठ आषाढ अमावस्या

जेष्ठ आषाढ अमावस्येला तडकडताईंच्या या खेळाला सुरूवात झाली आहे. ही परंपरा सांगलीकरांची प्रतिष्ठित अशी परंपरा आहे.

Sangli Tadkadtai Tradition

परंपरा

मागच्या २५० वर्षापासून ही परंपरा चालू आहे. तडकडताईंचा मान कुंभार घराण्याकडे असतो.

Sangli Tadkadtai Tradition

भुताची आई, तडकडताई म्हणत लहान मुले तडकडताईचे स्वागत करतात. त्यानंतर तडकडताई त्यांच्या डोक्यावर सूप मारते.

Sangli Tadkadtai Tradition

इडा पीडा टळतात

सूप मारल्यानंतर मुलांवरील सर्व इडा पीडा टळतात असं मानतात.

Sangli Tadkadtai Tradition

तडकडताई

दैत्यांचा संहार करण्यासाठी आणि शहराचे संरक्षण करण्यासाठी तडकडताई गावात फिरत असते असा समज आहे.

Sangli Tadkadtai Tradition

या परंपरेचे मूळ २५० पुर्वीच्या एका घटनेत दडलेले आहे. कर्नाटकमधील बदामी येथून ७ वाट्या मानवांनी पळवून आणल्या होत्या.

Sangli Tadkadtai Tradition

प्रथा

या वाट्या सांगली, आष्टा, कासेगाव, पलूस, कवठेपिरान या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली असं म्हणतात.

Sangli Tadkadtai Tradition

चौडेश्वरी देवी

चौडेश्वरी देवी गावकऱ्यांना त्रास देणाऱ्या दैत्यांपासून गावकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी असा अवतार घेते असं म्हणतात.

Sangli Tadkadtai Tradition

लग्नाची वरात

जेष्ठ महिन्याच्या अमावस्येनंतर जोगण्या उत्सवाला सुरुवात होते. या उत्सवामध्ये तडकडताईच्या लग्नाची वरात काढण्यात येते. तिचं लग्न लावण्यात येते.

Sangli Tadkadtai Tradition

जोगवा

त्यानंतर ती पौर्णिमेपर्यंत शहरात जोगवा मागते अशी ही परंपरा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Tadkadtai Tradition