Shahid Afridi : पाकिस्तानकडे खेळाडूंच्या उपचारासाठी नाहीत पैसे?

अनिरुद्ध संकपाळ

पाकिस्तानचे प्रमुख अस्त्र शाहीन आफ्रिदी सध्या दुखापतीने त्रस्त आहे.

दुखापतीतून सावरत असलेल्या शाहीनला टी 20 वर्ल्डकप संघात स्थान मिळाले आहे.

मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एक खळबळजनक दावा केला.

शाहिदने PCB वर आरोप केला की शाहीन आफ्रिदी स्वतःच्या खर्चाने लंडनला गेला आणि दुखऱ्या गुडघ्यावर उपचार करून घेतले.

पाकिस्तान स्वतःच्या खेळाडूंवर उपचार देखील करू शकत नाहीये. शाहीन स्वतः तिकीट काढून लंडनला गेला.

शाहिद म्हणाला की, मी इथून डॉक्टरांशी संपर्क केला. त्यानंतर शाहीनने त्या डॉक्टरकडे उपचार घेतले. तो स्वतःच्या खर्चावर तेथे रहात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.