...म्हणून शाहू महाराज होते लोकराजा

सकाळ डिजिटल टीम

सामाजिक न्याय दिवस

आज राजर्षी शाहु महाराज यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1874 साली झाला. त्यांचा जन्मदिवस 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून देखील साजरा केला जातो.

Chatrapati Shahu Maharaj | Sakal

चौथे शाहू

रयतेच्या मनात एक विशिष्ट स्थान निर्माण करणारे छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू म्हणून प्रसिद्ध आहेत.

Chatrapati Shahu Maharaj | Sakal

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. 

Chatrapati Shivaji Maharaj | Sakal

बाबासाहेब आंबडेकर

त्यांनी  डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर यांना  त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मुकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते.

dr. babasaheb ambedakar | Sakal

न्याय

ब्रिटिश राज्यसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले.

Chatrapati Shahu Maharaj | Sakal

तत्त्वे

स्वातंत्र्यापूर्वीच  समता , बंधुता, धर्मनिरपेक्षता , सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो.

Chatrapati Shahu Maharaj | Sakal

मानाचा मुजरा.

राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक  मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. अश्या या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chatrapati Shahu Maharaj | Sakal