Shubham Banubakode
महाराष्ट्रातील यवतमाळ ते अचलपूर आणि मुर्तिजापूर-अचलपूर मार्गावर धावणारी शकुंतला रेल्वे १९१६ मध्ये सुरू झाली होती.
ब्रिटिश कंपनी किलिक-निक्सनने स्थापन केलेल्या सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी (CPRC) ने ही रेल्वे सुरू केली होती. ही भारतातील एकमेव खासगी रेल्वे आहे.
अमरावतीतील कापूस मुंबईपर्यंत आणि तिथून पुढे इंग्लंडच्या मँचेस्टरला पाठवण्यासाठी ही नॅरो गेज रेल्वे सुरू करण्यात आली होती.
स्वातंत्र्यानंतरही शकुंतला रेल्वे CPRC च्या मालकीखाली राहिली. भारतीय रेल्वेला या मार्गावर ट्रेन चालवण्यासाठी दरवर्षी १ ते २ कोटी रुपये रॉयल्टी द्यावी लागत होती.
स्वातंत्र्यानंतर या मार्गावर शकुंतला पॅसेंजर ट्रेन धावत होती, जी दररोज ८०० ते १,००० प्रवाशांना सेवा देत होती.
२०१७ मध्ये यवतमाळ-मुर्तिजापूर आणि २०१९ मध्ये मुर्तिजापूर-अचलपूर मार्गावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली.
आता भारतीय रेल्वे CPRC कडून शकुंतला रेल्वेचा ताबा घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लवकरच ही रेल्वे पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
२०१६ मध्ये रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी नॅरो गेज मार्गाला ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी १,५०० कोटी रुपयांची तरतूद केली. या प्रकल्पाचे काम आजही सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.