7 वेळा तुटलंय शमिताचं मन, पहिल्या प्रेमाचा अंत खूपच वाईट..

प्रणाली मोरे

शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी आपल्या कामापेक्षा अधिक वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे.

Esakal

बिग बॉस ओटीटी सुरु असताना शमिता शेट्टीनं आपल्या पहिल्या बॉयफ्रेंड विषयी मोठा खुलासा केला होता.तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडचा एका कार अपघातात मृत्यू झाला होता.

Esakal

मीडिया रिपोर्ट्नुसार शमिता आणि आफताब शिवदसानीचं देखील अफेअर होतं. पण आपसातील मतभेदांमुळे दोघांनी ब्रेकअप केलं.

Esakal

२०१२ साली हरमन बावेजा आणि शमिता शेट्टीनं रिलेशनशीपमध्ये असल्याचं जाहिर केलं होतं ,पण नंतर काय बिनसलं कुणास ठाऊक दोघांनी अचानक रातोरात ब्रेकअपचा निर्णय घेतला.

Esakal

क्रिकेटर युवराज सिंग देखील शमिता शेट्टीला लपून डेट करत होता अशी बातमी आहे पण या दोघांचं अफेअर काही दिवसांतच संपलं .

Esakal

मनोज बाजपेयी सोबत शमितानं 'फरेब' आणि 'बेवफा' मध्ये एकत्र काम केलं होतं. शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीकता वाढल्याची बातमी तेव्हा जोरदार पसरली होती.

Esakal

शमितानं 'मोहब्बते' सिनेमातून उदय चोप्रा सोबत सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीकता वाढली खरी पण सिनेमा संपता संपता ब्रेकअपही झालं.

Esakal

शमिता शेट्टी आणि राकेश बापट बिग बॉस दरम्यान एकत्र आले. दोघे लवकरच लग्न करणार अशी चर्चा सुरू असताना दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीनं चाहत्यांना नाराज केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal