Navratri Festival : कोल्हापूरच्या अंबाबाईची मोहिनी रूपात पूजा; तुळजा भवानी दिसली केळीच्या बनात

सकाळ डिजिटल टीम

अंबाबाईची मोहिनी रूपातील पूजा

कोल्हापूर : श्री अंबाबाईची शुक्रवारी मोहिनी रूपातील पूजा बांधण्यात आली. श्रीपूजक सचिन ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी ही पूजा बांधली. (फोटो - मोहन मेस्त्री)

Shardiya Navratri Festival Kolhapur

केळीच्या बनात फलाहार करणारी देवी

छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भवानी मंडपातील श्री तुळजा भवानी मंदिरात देवीची शुक्रवारी केळीच्या बनात फलाहार करणारी देवी रूपातील पूजा.

Shardiya Navratri Festival Kolhapur

देवीची रथारुढ पूजा

टेंबलाई टेकडी येथील त्र्यंबोली देवीची शुक्रवारी रथारुढ पूजा बांधण्यात आली. संतोष गुरव, रोहित गुरव, ओंकार गुरव, सदानंद गुरव यांनी ही पूजा बांधली.

Shardiya Navratri Festival Kolhapur

महालक्ष्‍मी स्तुती रूपातील पूजा

राशिवडे : सहाव्या दिवशी येथील देवीची शिवकृत महालक्ष्‍मी स्तुती रूपातील पूजा. (फोटो - राजू कुलकर्णी)

Shardiya Navratri Festival Kolhapur

कुंकुमार्चन पूजा

पन्हाळा : येथील श्री अंबाबाईची सहाव्या दिवशी बांधलेली कुंकुमार्चन पूजा. (फोटो - धीरज कुराडे, पन्हाळा)

Shardiya Navratri Festival Kolhapur

रुक्मिणी माता रूपात बांधलेली खडी सालंकृत पूजा

कोडोली (ता. पन्हाळा) : येथील अंबाबाई मंदिरातील मूर्तीची शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी रुक्मिणी माता रूपात बांधलेली खडी सालंकृत पूजा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardiya Navratri Festival Kolhapur