शहनाज गिलसारखी स्लीम फिगर हवीय? फॉलो करा या टिप्स

साक्षी राऊत

शहनाज गिलची वेट लॉस जर्नी अनेकांसाठी इन्स्पिरेशन ठरते. तुम्हाला शहनाजप्रमाणे स्लीम फिगर हवी असेल तर या काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.

Shehnaaz Gill

शहनाजने कमी केलं १२ किलो वजन

बिग बॉस-१३ नंतर शहनाज फार चर्चेत आहे. तिच्या करियरचा ग्राफही उंचावल्याचे दिसूनय येते. बिग बॉस - १३ नंतर शहनाजने सहा महिन्यात १२ किलो वजन कमी केलं.

Shehnaaz Gill

जिम

शहनाजने एका मुलाखतीत सांगितले की, वेटलॉससाठी तिने इंटेंस वर्कआउटची मदत घेतली नाही. ती एक्सरसाइज करण्यावर विश्वास ठेवते. तिने कधीच इंटेंस वर्कआउट करून वजन कमी केले नाही.

Shehnaaz Gill

डाएट

शहनाजने वजन कमी करण्यासाठी तिच्या डाएटवर कायम विशेष लक्ष दिले.

Shehnaaz Gill

पोर्शन कंट्रोल

शहनाजच्या स्लीम ड्रिम फिगर आणि बारीक कंबरेचं सीक्रेट तिचं पोर्शन कंट्रोल करणे हे आहे. काही पदार्थ ती फार कमी प्रमाणात खाते तर काही पदार्थ तिने डाएटमधून पूर्णपणे वगळले आहे.

Shehnaaz Gill

शहनाजचे या गोष्टी डाएटमधून वगळल्या

शहनाजने तिच्या वेटलॉस जर्नीदरम्यान नॉन व्हेज, दही, तूप, चॉकलेट आणि आइस्क्रिम हे पदार्थ पूर्णत: वगळले होते. हे सगळे पदार्थ अभिनेत्री फार आवडीचे होते मात्र वजन कमी करण्यासाठी तिने डाएटमधून वगळले.

Shehnaaz Gill

घरचे जेवण

शहनाजने डाएटदरम्यान घरच्या खाण्यावर जास्त फोकस ठेवला. तिने बाहेरचे जंक फूड अजिबात खाल्ले नाही. ती तिच्या दिवसाच्या आणि रात्रीच्या जेवणात चपाती, वरण आणि भाजी खात होती.

Shehnaaz Gill

पाणी पिणे गरजेचे

शहनाज गिल तिच्या वेट लॉस जर्नीदरम्यान भरपूर पाणी पित होती. पाण्याला टेस्टी बनवण्यासाठी तिने पाण्यात स्ट्रॉबेरी आणि काकडी मिसळली. पाणी तुमच्या स्किनसाठी फार फायद्याचे ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shehnaaz Gill