चार वर्षांनंतर शिवम दुबेने घेतली IPL मध्ये विकेट!

Kiran Mahanavar

आयपीएल 2024 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पंजाब किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात दुबेने बॅटने कोणतीही जादू दाखवली नाही. मात्र, त्याने एक विकेट घेण्यात यश आले.

पंजाबच्या डावाच्या पहिल्याच षटकात दीपक चहरला दुखापत झाली. यानंतर दुबेला एक ओव्हर टाकावी लागली.

यादरम्यान त्याने बेअरस्टोची विकेट घेतली. दुबेने चार वर्षांनंतर आयपीएलमध्ये एकही विकेट घेतली आहे.

त्याची आयपीएलमधील एकूण पाचवी विकेट होती. त्याने आयपीएल 2020 मध्ये उर्वरित चार विकेट घेतल्या.

शिवमने IPL 2020 मध्ये प्रियम गर्ग, मिचेल मार्श, निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल यांना बाद केले होते.

तेव्हा दुबे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळत होता. अष्टपैलू खेळाडू म्हणून दुबेचा टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.