Shivpratap Din Pratapgad : प्रतापगडावर शिव जयघोष... थरारक कसरती अन् रोमांच..

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

महाबळेश्‍‍वर : छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जयघोषात, अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या तुताऱ्या, झांजांचा आवाज, ढोल-ताशांचा गजर आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवरायांच्‍या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडसी खेळांचे अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिके अन् शिवपराक्रमाच्‍या अभिमानाने भारावलेल्या वातावरणात काल (मंगळवार) किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Pratapgad Mahabaleshwar Satara

भक्तिमय वातावरणात भवानीमातेची महापूजा

सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानीमातेची महापूजा करण्यात आली. पुजारी शंकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले.

Pratapgad Mahabaleshwar Satara

ध्वजस्तंभाचे विधिवत पूजन

भवानीमातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजास कुंभरोशीच्‍या सरपंच ज्योती जंगम यांच्या हस्ते वंदन करण्‍यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.

Pratapgad Mahabaleshwar Satara

पालखीची वाजत-गाजत मिरवणूक

आई भवानीच्‍या आरतीनंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरू झाली.

Pratapgad Mahabaleshwar Satara

पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली.

Pratapgad Mahabaleshwar Satara

शिवरायांचा जयजयकार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावळी, दरे, वाडा कुंभरोशीचे विद्यार्थी, विद्यार्थिनींचे लेझीम, तुताऱ्या, काठीवर चालणारी मुले, आई भवानीमातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला होता.

Pratapgad Mahabaleshwar Satara

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, महाबळेश्वरच्‍या तहसीलदार तेजस्विनी पाटील, महाबळेश्वरचे मुख्याधिकारी योगेश पाटील, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो : प्रमोद इंगळे)

Pratapgad Mahabaleshwar Satara

IPL 2024 Auction : हार्दिकमुळं मुंबई इंडियन्सची लिलावात कंजूसी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik-Pandya-MI