Shloka Ambani : सासऱ्यांनी दिलं कोहिनूरपेक्षाही महागडं गिफ्ट?

सकाळ डिजिटल टीम

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये मुकेश अंबानींचे नाव घेतले जाते. नीता अंबानी यांच्या नावानं तयार करण्यात आलेल्या कल्चर सेंटरचे गेल्या आठवड्यात उद्धघाटन झाले.

आता अंबानी परिवाराच्या लाडक्या सूनेविषयीची बातमी व्हायरल होताना दिसते आहे.अंबानी कुटूंबीय हे त्यांच्या लक्झरी लाईफसाठी देखील ओळखले जातात.

मुकेश अंबानी यांच्या मुलाची आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहताला मिळालेल्या गिफ्टची चर्चा आहे.

ज्वेलरी आणि आऊटफिट्सकरिता अंबानी कुटुंबातील सदस्यांची चाहत्यांमध्ये चर्चा असते.

श्लोका यांना गिफ्ट म्हणून जो हार देण्यात आला त्याची चर्चा होताना दिसते आहे. त्याची किंमत प्रचंड आहे.

मीडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी सुनेला दिलेल्या गिफ्टची किंमत कित्येक कोटीत आहे.

९१ हिऱ्यांनी यार केलेला तो हार दोनशे कॅरेट्सचा आहे. अशी माहिती आहे.

श्लोकाकडे जो हार आहे त्याची ना कॉपी केली जाऊ शकते ना तो पुन्हा तयार केला जाऊ शकतो. अशीही माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

दोनशे कॅरेटस त्या हाराची किंमत तब्बल ४५० कोटी रुपये आहे. हा आकडा ऐकून धक्का बसला नसेल तरच नवल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shloka Ambani Expensive Gifts By Father In Law