कमाईच्या बाबतीत सानिया - शोएबमध्ये कोण वरचढ?

अनिरुद्ध संकपाळ

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्यातील वैवाहिक नातं संपुष्टात आलं आहे यावर आज शिक्कामोर्तब झालं.

शोएब मलिकने पाकिस्तानची आघाडीची अभिनेत्री सना जावेदसोबत निकाह केला असून याची माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.

सानिया मिर्झा ही भारताची आघाडीची टेनिसपटू राहिली आहे. जरी तिने शोएबशी लग्न केलं तरी ती भारताकडूनच खेळली अन् तिनं पाकिस्तानऐवजी दुबईत राहणं पसंत केलं.

शोएब देखील पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू असल्याने कमाईच्या बाबतीत दोघेहीजण एकमेकांपेक्षा कमी नाहीत.

सानिया मिर्झा टेनिसमधून जवळपास वर्षाला 3 कोटी रूपये कमवत होती. याचबरोबर विविध जाहिरातींमधूनही तिला कोट्यावधी रूपये मिळतात.

सानिया तेलंगणा राज्याची ब्रँड अम्बेसेडर आहे. ती जाहिरातींद्वारे वर्षाला जवळपास 25 कोटी रूपये कमवते. तिचे हैदराबादमध्ये 13 कोटी रूपयांचे आलिशान घर आहे.

दुबईतही आलिशान घर असून ते एका बेटावर आहे. सानियाची एकूण संपत्ती ही जवळपास 200 कोटींच्या घरात आहे.

दुसरीकडे शोएब मलिकची एकूण संपत्ती ही जवळपास 228 कोटी रूपये इतकी आहे. त्याच्या कमाईचा मोठा हिस्सा हा खेळातून आणि ब्रँड एन्डॉर्समेंटमधून येतो.

धोनी, विराटपेक्षाही भारी.. कॅप्टन रोहितची गावसकरांनी पाठ थोपटली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.