Gold Investment: आर्थिक मंदीत सोन्यात गुंतवणूक करावी काय?

राहुल शेळके

गुंतवणूक करण्याचे मुख्य साधन

भारतीयांना सोन्याचे आकर्षण शेकडो वर्षांपासून आहे. पूर्वी पैशांची गुंतवणूक करण्याचे ते एक मुख्य साधन होते. आता गुंतवणुकीसाठी इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

Gold Investment | Sakal

महागाईवर मात

सोन्याचे वैशिष्ट्य म्हणजे महागाईवर मात करण्याचे ते एक उत्कृष्ट माध्यम मानले जाते. कारण दीर्घ कालावधीत त्यातून मिळणारा परतावा महागाईच्या दरापेक्षा बहुधा जास्त असतो.

Gold Investment | Sakal

जोखीम टाळण्यासाठी पर्याय

सोनेखरेदीच्या पारंपरिक पद्धतीत त्याच्या सुरक्षिततेची जोखीम असते. ही जोखीम टाळण्यासाठी लोकांकडे आता गोल्ड ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड), गोल्ड म्युच्युअल फंड, सॉव्हरिन गोल्ड बाँड आदी पर्याय उपलब्ध झाले आहेत. 

Gold Investment | Sakal

सरकारी सुवर्णरोखे

सोन्यात गुंतवणूक करायचीच असेल तर पहिली पसंती सरकारी सुवर्णरोख्यांना दिली पाहिजे. ते विकत घ्यायला किंवा साठवणूक करायला सोपे असतात आणि त्यावर वार्षिक व्याजही मिळते. 

Gold Investment | Sakal

सुरक्षित पर्याय

मागील दशकातच, आर्थिक मंदीच्या काळात सुरक्षित पर्याय म्हणून लोक गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त झाले तेव्हा त्यांनी सोन्यालाच पसंती दिली. 

Gold Investment | Sakal

आर्थिक मंदीमध्ये गुंतवणूक

आर्थिक मंदीच्या काळत सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. कारण इतर गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये अनिश्चितता असते. म्हणून आर्थिक मंदीच्या काळात सोन्याचे भाव वाढतात.

Gold Investment | Sakal

गुंतवणूक करण्याआधी

नोंद : सोन्या-चांदी मधील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Investment | Sakal