सकाळ डिजिटल टीम
बॉलिवूड मध्ये सर्वांत सुंदर अभिनेत्रींच्या यादीत श्रद्धा कपूरचे नाव घेतले जाते.ब्यूटी क्वीनचे इंस्टाग्रामवर ८१.८ मिलियन इतके चाहते आहेत.
पहिल्याच चित्रपटातून श्रद्धा कपूरने लाखो लोकांची मने जिंकली. अनेक चित्रपटांमध्ये तिने दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयात वेगळे स्थान बनवले आहे.
बऱ्याच दिवसांनंतर श्रद्धा कपूरने तिचे फोटोशूट केलेले फोटोज् इन्स्टावर शेअर केले आहेत. नेहमीप्रमाणेच श्रद्धाच्या चाहत्यांनी तिच्या सौंदर्यावर कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
श्रद्धा कपूरचे शॉर्ट हेअर आणि लाल रंगाचा ड्रेस ज्यामधे तिने गोल्डन झुमके घातले आहेत. श्रद्धाचे हा वेगळा लूक सध्या सोशल मिडिया वर खूप व्हायरल होत आहे.
श्रद्धा केवळ अभिनयासाठीच नाही तर तिच्या किलर लूकसाठीही सोशल मिडिया सतत चर्चेत दिसते.आपल्या ग्लॅमरस फोटोशूटने चाहत्याचे मन जिंकते.
श्रद्धा सर्व प्रकारच्या आउटफिट्समध्ये खूप सुंदर दिसते. श्रद्धाचा नविन चित्रपट 'स्त्री-२' लवकरच चाहत्याच्या भेटीला येत आहे.
या अगोदर श्रद्धाने साडीवर फोटोशूट केले होते. चाहत्यांनी श्रद्धाचा उल्लेख मराठमोळ सौंदर्य असा केला आहे.
मग कसा वाटला श्रद्धाचा नविन लूक आम्हाला कॉमेंट करुन नक्की कळवा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.