श्रावण महिन्यात पुण्यातील या महादेव मंदिरांना द्या भेट

सकाळ डिजिटल टीम

ओंकारेश्वर मंदीर

ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील शंकराचे एक पेशवेकालीन मंदिर आहे. पेशव्यांनी ऑक्टोबर १७३६ मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला आणि पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. नदीच्या काठावर प्रशस्त आवार असलेल्या या मंदिराला नऊ कळस आहेत.

Shravan month | sakal

नागेश्वर मंदीर

नागेश्वर मंदिर हे पुणे शहरातील अनेक पुरातन मंदिरांपैकी एक आहे. संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात आहे. एकेकाळी या मंदिराजवळ एक तलाव होता व या तलावाच्या पाण्यात कुष्ठरोग बरा होत असे अशी आख्यायिका आहे. मुख्य गाभाऱ्याची रचना यादव काळातील असून गाभाऱ्याला दगडी छत आहे.

Shravan month | sakal

पाताळेश्वर मंदीर

पाताळेश्वर हे पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेले एक शिवालय आहे. हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीचा सहावा राजा पहिला अमोघवर्ष याने त्याच्या काळात इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे.

Shravan month | sakal

वाघेश्वर मंदीर, वाघोली

पुणे जिल्ह्यातील श्री वाघेश्वर मंदिरास महान स्थळ म्हणून  संबोधले जाते. दाभाडे घराण्यातील मूळ पुरुष बजापाटील याचा मुलगा सोमाजी याचा मुलगा कृष्णाजी दाभाडे याने श्री वाघेश्वर महानस्थळ हे मंदिर बांधले. इ.स. १७२५ मध्ये या मंदिराची उभारणी गावातील टेकडीवर झाली, असा उल्लेख आढळला आहे.

Shravan month | sakal

रामदरा मंदीर

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावाच्या दक्षिणेला श्रीक्षेत्र रामदरा शिवालय हे देवस्थान आहे. सुमारे पन्नास वर्षा पूर्वी आयोध्येतील बाबा श्री १००८ देवपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांना या ठिकाणी रामाचे जागृत स्थान असल्याचा साक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना शिवलिंग आढळले.

Shravan month | sakal

सोमेश्वर मंदीर

सोमेश्वर महादेव मंदिर हे पुण्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक असणारे शिवालय म्हणून ओळखले जाते. या मंदिराशेजारूनच राम नदी वाहते. मंदिराच्या परिसरातील वीरगळ आणि इतर अवशेषांवरून त्याच्या इतिहासाचे धागे उलगडतात.

Shravan month | sakal

बनेश्वर मंदीर

बनेश्वर हे पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे असलेले महादेवाचे मंदिर आहे. पुणे शहरापासून नैऋत्य दिशेला ३६ किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. आजूबाजूस दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर हे ह्या जागेचे वैशिष्ट्य.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shravan month | sakal