Hit Wicket : राहुल ते अय्यर कोणी कोणी मारून घेतली पायवर कुह्राड

अनिरुद्ध संकपाळ

श्रेयस अय्यरने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात एक षटकार आणि एक चौकार मारत दमदार सुरूवात केली.

एका बाजूने सूर्यकुमार यादव आक्रमक फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूनेही अय्यर धावा करत होता. मात्र ही स्थिती फार काळ टिकली नाही. तो 13 धावांची भर घालून हिट विकेट झाला.

श्रेयस अय्यर हिट विकेट झाला त्यावेळी कर्णधार हार्दिकच्या आठवणी देखील ताज्या झाल्या असतील. टी 20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरूद्धच्या सेमी फायनलमध्ये हार्दिक पांड्या देखील डावाच्या शेवटच्या चेंडूवर हिट विकेट झाला होता.

भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 4 फलंदाज हिट विकेट झाले आहे. यात सर्वात पहिल्यांदा केएल राहुलचा लागतो. तो 2018 मध्ये श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात हिटविकेट झाला होता.

त्यानंतर हर्षल पटेल न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर हिट विकेट झाला होता.

आता श्रेयस अय्यर देखील याच पंक्तीत जाऊन बसला आहे. विशेष म्हणजे अय्यर हा जगातील 25 वा हिट विकेट होणारा फलंदाज ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.