Shukravar Upay : शुक्रवारी हे उपाय केल्याने होईल धनवर्षाव

धनश्री भावसार-बगाडे

लक्ष्मीकृपा

शुक्रवार लक्ष्मीदेवीचा वार असतो. त्यामुळे या दिवशी विधीवत पूजेने देवीची कृपा प्राप्त होते.

Shukravar Upay | esakal

पैशांच्या अडचणी

शुक्रवारी हे उपाय केल्याने आर्थिक अडचणींतून सुटका, प्रेमातील अडचणी दूर होतात.

Shukravar Upay | esakal

कमळाचे फुल

देवीला कमळाचं फुल सगळ्यात प्रिय असतं. पांढऱ्या रंगाचे कपडे घालून लक्ष्मी देवीची विधीवत पूजा करा.

Shukravar Upay | esakal

प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा

ज्या घरात स्वच्छता राखली जाते तिथे लक्ष्मी वास करते. शुक्रवारी घराचे प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा. गंगाजल शिंपडा, दारावर शुभ-लाभ आणि स्वस्तिक काढा.

Shukravar Upay | esakal

संध्याकाळी घरात अंधार करू नये

असं म्हणतात संध्याकाळची वेळ लक्ष्मीदेवीच्या आगमनाची असते. त्यावेळी संपूर्ण घराचे दिवे सुरू ठेवावे. घरात कुठेच अंधार नसावा. यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

Shukravar Upay | esakal

गायीला पोळी खाऊ घाला

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी गायीला पोळी खाऊ घातल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. त्यांची कृपा कायम राहते. जीवनात कधी धनाची कमी राहत नाही.

Shukravar Upay | esakal

वस्त्रदान

शुक्रवारी एखाद्या मंदिरात किंवा कुठेही गरिबांना वस्त्रदान करा. यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

Shukravar Upay | esakal

या वस्तू अर्पण करा

ज्योतिषशास्त्रानुसार देवीला शंख, कौडी, कमळाचे फुल, मखाना आणि बत्ताशा अर्पण करावे. या लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंमुळे धनलाभ होतो.

Shukravar Upay | esakal

कर्जांतून मुक्ती

शुक्रवारी पिवळ्या कपड्यात पाच कौड्या, एक चांदीचं नाणं बाधून तिजोरीत ठेवा. यामुळे धनाची आवक वाढेल आणि कर्जमुक्तता होईल.

Shukravar Upay | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shukravar Upay | esakal