Anuradha Vipat
करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो कॉफी विथ करण 8 सध्या चर्चेत आहे. यावेळी दोन मित्र म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन या शोमध्ये सहभागी झाले आहेत.
या एपिसोडमध्ये वरुण आणि सिद्धार्थने अनेक रंजक खुलासे केले आहेत. जे सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.
एपिसोडच्या रॅपिड फायर राउंडमध्ये, करण जोहरने सिद्धार्थ मल्होत्राला विचारले की तो त्याच्या सिंगल लाइफमध्ये कोणती गोष्ट सर्वात जास्त मिस करतो.
या प्रश्नाचे उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला- 'कियाराला गुपचूप भेटणं'. अभिनेत्याने सांगितले की, तो लग्नापूर्वी पत्नी कियाराला गुपचूप भेटत असे. पण आता लग्नानंतर हे शक्य नाही ज्याला तो खूप मिस करतो. वरुण धवननेही सिद्धार्थच्या या उत्तरावर अतिशय गोंडस प्रतिक्रिया दिली.
करणच्या शोमध्ये सिद्धार्थने आणखी अनेक खुलासे केले आहेत. त्याने सांगितले की, कियारासोबत त्याची पहिली भेट शेरशाहच्या शूटिंगदरम्यान नसून लस्ट स्टोरीच्या रॅप-अप पार्टीमध्ये झाली होती.
सिद्धार्थ मल्होत्रा शेवटचा मिशन मजनू या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना दिसली होती.
कियारा अडवाणी कार्तिक आर्यनसोबत सत्यप्रेम की कथा या चित्रपटात दिसली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.