साक्षी राऊत
अभिनेत्री प्रियंका तिच्या वाढत्या वयाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसू नये म्हणून आईने सुचवलेला उपाय करते. चला तर प्रियंका कोणत्या नॅचरल पद्धतीने त्वचेची काळजी घेते ते जाणून घेऊया.
अलीकडेच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये प्रियंकाने सांगितले की ती रोज रात्री चेहऱ्यावर नारळाचे तेल लावते. या तेलात नॅचरल मॉश्चरायझिंग गुण असतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो येतो.
रोज रात्री झोपण्यापूर्वी प्रियंका चेहऱ्याचा कोकोनट ऑइलने मसाज करते. मसाज केल्यानंतर ती गरम पाण्याने भिजवलेल्या टॉवेलने स्किनला व्यवस्थित पुसून घेते. ज्यामुळे चेहऱ्याचा निखार आणखी वाढतो.
प्रियंकाने सांगितले की ती कामात एवढी व्यस्त असते की तिची झोप पूर्ण होत नाही. झोप न झाल्यास तुमच्या त्वचेवरही त्याचा गंभीर परिणाम दिसून येतो. त्यामुळे ती नियमित भरपूर पाणी पिते.
चुकीच्या डाएटमुळे आणि अपूर्ण झोपेमुळे त्वचा डल होते. अशात पाण्याचे सेवन त्वचेला तुम्हाला मऊपणा प्रदान करते. हायड्रेटेड स्किनवर डलनेस आणि ड्रायनेसची समस्या उद्भवत नाही आणि त्वचा निखळ दिसते.
प्रियंका चेहऱ्यावर हळद आणि उटण्याचा लेप लावते. हळदीत करक्यूमिनचे अँटी-ऑक्सिडंट्स गुण असतात. जे पिठात मिक्स झाल्यानंतर उन्हेंस होऊन जातात ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
एका बाऊलमध्ये २ चमचे गव्हाचं पीठ आणि दोन चिमुट हळद मिक्स करा. यात दोन चमचे गुलाबजल टाकून असे मिक्स करा.आता चेहऱ्यावर लावून ते अर्ध्या तासासाठी ठेवा. अर्ध्या तासानंतर त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
प्रियंका रोज बाथ घेतल्यानंतर त्वचेवर ऑर्गन ऑइलचा वापर करते. ऑर्गन ऑइलचे मॉश्चरायझिंग एलिमेंट त्वचेला दीर्घकाळापर्यंत मऊपणा प्रदान करते. ज्यामुळे स्कीन सॉफ्ट आणि शाइनी बनते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.