दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री लवकर झोप येत नाही? ट्राय करा ‘या’ टिप्स

सकाळ डिजिटल टीम

दिवसभराच्या थकव्यानंतर झोप ही आवश्यक असते. पण अनेकजणांना रात्री लवकर झोप येत नाही.

डॉक्टर सुद्धा रात्री लवकर झोपण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या मते आपण ७-८ तास झोपायला हवे. पण अनेकांना रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही.

आम्ही तुम्हाला आज पाच सोपी टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची ही समस्या कायमची दुर होणार.

जर तुम्हाला रात्री झोपेचा त्रास होत असेल तर दररोज रात्री झोपण्याच्या पुर्वी 5 मिनिटे प्राणायम करावे.


लाईफस्टाईलमध्ये बदल करा. जेवल्यानंतर शतपावली करणे. रात्री लवकर झोपणे, मोबाईल कमी वापरणे असे छोटे मोठे बदलांमुळे तुम्हाला लवकर झोप येईल.

योग्य आहार घेणे गरजेचे आहे. संध्याकाळी चहा किंवा कॉफी घेऊ नये. तसेच रात्रीचे जेवण शक्य तितक्या लवकर करावे.

याशिवाय रोज रात्री झोपण्यापुर्वी जायफळ, हळद, वेलची मिक्स केलेले गरम दुध प्यावे.

रात्री झोप येत नसेल तर पायाच्या दोन्ही तळव्यावर तेल लावून मसाज करावी यानंतर पाण्याने तळपाय धुवावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.