तुम्हीही चालताना या चुका करता का? आजपासूनच या सवयी टाळा

Aishwarya Musale

निरोगी

लोक निरोगी राहण्यासाठी अनेक उपाय करतात. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्दी डाएटपासून ते वर्कआउटपर्यंत लोक अनेक गोष्टींचा वापर करतात. मात्र, रोजच्या धावपळीनंतर आणि दिवसभर व्यस्त असल्याने व्यायामासाठी वेळ मिळणं कठीण झालं आहे.

व्यायाम

अशा वेळी, बहुतेक लोकांना स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालायला आवडतं. खरंतर, चालणं हा एक चांगला आणि सोपा व्यायाम प्रकार आहे. चालताना कोणत्या चुका अजिबात करू नयेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

तुमच्या पोश्चरकडे लक्ष द्या  

जर तुम्हाला चालण्याचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर नेहमी तुमच्या पोश्चरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असे केल्याने श्वासोच्छवासाची गती सुधारते, पाठीचा ताण कमी होतो.

हात स्विंग करा

चालताना हात फिरवणे हा चालण्याचा एक चांगला मार्ग आहे. चालताना हात फिरवल्याने तुमची चालण्याची क्षमता सुधारते. तसेच, बरेच लोक चालताना हात न फिरवता संथ गतीने चालतात. त्यामुळे तुम्हाला चालण्याचा योग्य फायदा मिळत नाही.  

चुकीच्या चपला वापरू नका

चालताना कोणते शूज घालावेत, तुमच्या पायांना कोणते शूज कंम्फर्टेबल होतील याचा नीट विचार करा. यामुळे चालताना तुम्हाला कोणतीही दुखापत होणार नाही. 

पाण्याची कमतरता

चालताना हायड्रेटेड राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही डिहायड्रेटेड झाल्यास, तुम्हाला थकवा येऊ शकतो. अशा वेळी चालताना नेहमी पाण्याची बाटली तुमच्या बरोबर ठेवा आणि वारंवार पाणी पित राहा. 

मोबाईल

चालताना अनेकदा लोकांना खाली पाहत मोबाईल वापरण्याची सवय असते. मात्र, या सवयीचा तुमच्यावरही नकारात्मक परिणाम होतो.

असे केल्याने तुमच्या मानेवर आणि पाठीवर दबाव येऊ शकतो. अशा वेळी चालताना मोबाईल वापरणं टाळा

डायबिटीस असलेल्या रूग्णांनी कांदा खावा की नाही? जाणून घ्या…

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.