पुन्हा केळेवाली बनून घायाळ करणार सोनाली...

प्रणाली मोरे

मराठी सिनेमातील अप्सरा सोनाली कुलकर्णी म्हटलं की काहीतरी हटके बघायला मिळणार याची आता तिच्या चाहत्यांना सवयच झाली आहे.

Esakal

छंद लागला म्हणत सोशल मीडियावर तुफान हिट झालेल्या सोनालीच्या डान्सचा, अभिनयाचा, भूमिकेचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्याचा जणू तिच्या चाहत्यांना छंदच लागला आहे.

Esakal

" केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का ? " हे गाणं दादा कोंडकेंच्या सिनेमातील मास्टरपीस. दादांच्या सिनेमातील तीच केळेवाली बनणार आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Esakal

सोनाली दादा कोंडके यांच्या सुपर हिट चित्रपटातील सुपर हिट गाण्यांवर झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड या सोहळ्यात नृत्य सादर करणार आहे .

Esakal

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड मध्ये सोनाली आणि दादा कोंड़केंच्या भूमिकेत विनोदवीर भाऊ कदम सुद्धा केळ्याची टोपली डोक्यावर घेऊन ठुमके मारताना दिसणार आहेत.

Esakal

कॉमेडी अॅवार्ड असल्याने विनोदी सिनेमांचा श्वास असलेल्या दादा कोंडके यांची गाणी, डायलॉग अशी या सोहळ्यातील मनोरंजनाची थीम आहे.

Esakal

या पुरस्कार सोहळ्यातच सोनाली पांडु हवालदारवर फिदा असलेल्या केळेवालीच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal