एवढं मानधन घेतात दक्षिणेतील अभिनेते एका चित्रपटासाठी..

सकाळ डिजिटल टीम

पैसा प्रत्येकजण कमावतो.... पण सन्मान मिळवणे प्रत्येकाच्या नशिबात नसतं, पण दक्षिणेतील अभिनेत्यानी नाव,सन्मान,पैसा हे सगळंच मिळवलेल आहे.

रजनीकांत

या यादीत सगळ्यात अगोदर नाव येत तर ते रजनीकांत म्हणजेच शिवाजी राव गायकवाड.ज्यांना दक्षिणेतील लोक आपला देव मानतात. रजनीकांत एका चित्रपटात काम करण्यासाठी 150 कोटींहून अधिक रुपये घेतात.

प्रभास

बाहुबली चित्रपटात अभिनेता प्रभासने जबरदस्त अभिनय आणि अ‍ॅक्शननंतर तो खूपच प्रसिद्ध झाला. प्रभास आता एका चित्रपटात काम करण्यासाठी 100 ते 150 कोटी रुपये घेतो.

Actors / South India | sakal

थलापति विजय

थलापति विजयचे (जोसेफ़ विजय चंद्रशेखर) बिगिल या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी 50 कोटी इतकी रक्कम मिळाली होती. या चित्रपटाची कमाई 300 कोटी एवढी झाली.आणि आता तो एका चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी 150 कोटी रुपये घेतो.

Thalapathy Vijay | sakal

अल्लू अर्जुन

तेलुगूतील सुपरस्टार अल्लू अर्जुन जो पुष्पा,आर्या, बन्नी चित्रपटातून जबरदस्त अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातो. पुष्पा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने आपली फी 120 कोटी रुपये एवढी केली आहे.

Allu arjun | Sakal

महेश बाबू

अभिनेता महेश बाबू. भारतआने आणि महर्षी सारखे अनेक हिट चित्रपट देणारे महेश बाबू एका चित्रपटात काम करण्यासाठी 80 कोटी रुपये घेतो. महेश बाबूचा चित्रपट 200 कोटी रुपये कमावतो असे म्हटले जाते.

Mahesh babu | sakal

ज्युनियर एनटीआर

आरआरआर ह्या चित्रपटातील ऑस्कर पुरस्कार मिळालेल नाटु नाटु या गाण्यात दिसणारा साऊथचा प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर एका चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी 60-80 कोटी इतकी रक्कम घेतो.

junior NTR | sakal

राम चरण

एसएस राजामौलीचा पीरियड अ‍ॅक्शन ड्रामा आरआरआर हिट झाल्यानंतर, अभिनेता राम चरण हा अभिनेता एका चित्रपटात काम करण्यासाठी 45 ते 50 कोटी रुपये घेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ram charan | sakal