'हे' आहेत सोशल मीडिया न वापरणारे भारताचे स्टार क्रिकेटपटू

अनिरुद्ध संकपाळ

सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटपटूंना असंख्य लोक फॉलो करतात.

Virat Kohli

क्रिकेटपटू देखील आपल्या या फॅन फॉलोईंगचा आर्थिक दृष्ट्या फायदा उचलत असतात.

Hardik pandya

मात्र भारताचे असेही काही क्रिकेटपटू आहेत जे सोशल मीडिया वापरतच नाहीत.

Rohit Sharma

यामध्ये भारताचा प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविडचा पहिला क्रमांक लागलो.

Rahul Dravid

राहुल आपले खासगी आयुष्य खासगीच ठवतो. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसण्याबाबत तो म्हणतो की याचं काही खास कारण नाही. मी फोन लोकांशी बोलण्यासाठी वापरतो. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्यासाठी मला कोणतेही कराण दिसत नाही.

राहुलच्या यादीत आशिष नेहराचा देखील समावेश आहे. त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट आहे मात्र त्यावर त्याने एकही पोस्ट केलेली नाही.

आशिष नेहराचे इन्स्टाग्रावर 39 हजार फॉलोअर्स आहेत. आशिष नेहरा याबाबत म्हणाला होता की त्याला व्यावसायिक पोस्ट करण्याची ऑफर मिळाली होती. मात्र ती त्याने नाकारली.

भारताचे दिग्गज माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर हे देखील सोशल मीडियापासून लांबच असतात. मात्र त्यांच्या अकादमीचे सोशल मीडिया अकाऊंट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.