@ 150! अ‍ॅशेसमध्ये ब्रॉडचा धुमाकूळ, ठरला इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज

अनिरुद्ध संकपाळ

अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या दिवशी जोरदार पुनरागमन केले.

Stuart Broad

या पुनरागमनाच मोलाचा वाटा हा स्टुअर्ट ब्रॉडचा होता. त्याने 47 धावांवर खेळणाऱ्या उस्मान ख्वाजासह ट्रॅविस हेडला देखील बाद केले.

Stuart Broad

ब्रॉडने या दोघांना बाद करताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. असा विक्रम करणं खुद्द जेम्स अँडरसनला देखील जमलं नाही.

Stuart Broad

स्टुअर्ट ब्रॉड हा अ‍ॅशेस कारकिर्दीत 150 पेक्षा जास्त विकेट घेणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे.

Stuart Broad

स्टुअर्ट ब्रॉडने 40 अ‍ॅशेस सामन्यात आतापर्यंत 151 विकेट्स घेतल्या आहेत. अ‍ॅशेसमध्ये 150 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो फक्त तिसरा गोलंदाज ठरला.

Stuart Broad

यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने 195 तर ग्लेन मॅग्राने 157 विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shane Warne